प्रेम प्रत्येकाच्या जीवनातला एक नाजूक शब्द, अंधारात दिसणार प्रकाशाच एक किरण.मला तर वाटते प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम असावे. त्याच्या किवा तिच्या, जीवनात "तो " किवा "ती" ही असावीच. आपल्याला समजून घेणारा -समजून घेणारी कोणीतरी व्यक्ती असावी, सुख-दुख वाटून घेणारी. एकटे वाटले की मायेची सावली देणारी व्यक्ती. जीवनाच्या प्रवासात हातात हात घालून सोबत चालणारी, स्वतापेक्षाही जास्त प्रेम करणारी. प्रेम दाखवण्यासाठी करू नये तर ते एकमेकांच्या हृदयात जागा बनवण्यासाठी असावे. अस म्हटले जाते की प्रेमाचे दुसरे नाव म्हणजे " त्याग ". जीवनात केव्हा केव्हा असे क्षण येतात की, त्यावेळेला तिला किवा त्याला आपल्या प्रेमाचा त्याग करावा लागतो. आणि जो त्याग करतो किवा करते तोच किवा तीच प्रेमाचा अर्थ समजू शकली/ शकला असे मी म्हणेन.